आरती जाधव
इतिहासात डोकावून पाहिल्यास लक्षात येत की, दारूच्या व्यसनामुळे अनेक राजेमहाराजांना आपले राज्य गमवण्याची वेळ आली.
इतिहासात डोकावून पाहिल्यास लक्षात येत
की, दारूच्या व्यसनामुळे अनेक राजेमहाराजांना आपले राज्य गमवण्याची वेळ
आली. इतकेच नाहीतर दारूच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना विविध आजारांची लागण
होऊन त्यांचे आयुष्य वाढण्याऐवजी कमी झाले आहे. समाजात असे अनुभव आपण
क्षणोक्षणी घेत असतो. परंतु याचा खरा अनुभव दोन आठवडयांपूर्वी मुंबईकरांना
आला.
मालाड-मालवणी परिसरातील लक्ष्मीनगरमध्ये
विषारी दारू प्यायल्याने १०२ जणांना आपल्या प्राणास मुकावे लागले.
कुटुंबातील कमावती व्यक्ती या विषारी दारूची शिकार झाल्याने संपूर्ण कुटुंब
उद्ध्वस्त झाली आहेत. त्यामुळे दारू विक्रीवर बंदी घालणे अत्यंत आवश्यक
आहे. मागील पाच वर्षात दारूमुळे मृत्यू पावलेल्या लोकांची आकडेवारी पाहिली
तर ती लाखोच्या घरात जाते.
दिवसेंदिवस ही संख्या प्रकर्षाने वाढताना
दिसून येत असून आपले सरकार मात्र, गप्प बसले आहे. त्यामुळे शांत न बसता
सरकारने दारूच्या विक्रीबाबत धोरणात्मक पावले उचलणे गरजेचे आहे. जेणेकरून
दारूच्या या व्यसनात कोणाचे वडील, कोणाचाही भाऊ, कोणाचाही पती किंवा
कोणाचाही मुलगा वाया जाणार नाही.
दारूच्या सेवनामुळे भारतात २००८ मध्ये
४,३०८ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर २००९ मध्ये ४,४८३ जणांचा, २०१०
साली ४,८८६ जणांचा, २०११ साली ४,५४७ जणांचा आणि २०१२ साली ५,४७८ जणांचा
मृत्यू झाला. मुळात व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती त्याचे दुष्परिणाम काय
होतील याचा तिळमात्रही विचार करत नाही. त्यात वाहवत जातात. त्यांना
कुटुंबाचा विसर पडतो, मुले अक्षरश: रस्त्यावर येतात. तसेच समाजातील
व्यक्तींचा व्यसनधीनतांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही बदलतो. त्याप्रमाणे
मालाड-मालवणी भागातील दुर्घटना घडल्यापूर्वी मुंबईतील विक्रोळीत २००४ मध्ये
विषारी दारू पिऊन अनेकांचा मृत्यू झाला होता.
या घटनेनंतर महाराष्ट्र सरकारने गावठी
दारूच्या विक्रीवर बंदी घातली. राज्यभरातील दारूच्या हातभट्टया बंद
पाडल्या. गावठी दारूची विक्री करणाऱ्यांवर जरब बसवली. ज्या भागात गावठी
दारूच्या हातभट्टया सापडतील, तिथल्या पोलीस ठाण्याच्या अधिकारी आणि
पोलिसांना जबाबदार ठरवले जाईल आणि त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा
बडगाही सरकारने उगारला होता. तेव्हाचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर.पाटील
यांनी अत्यंत कठोरपणे राज्यातील हातभट्टया आणि गावठी दारू दुकानदारांचे
जाळे उद्ध्वस्त केले होते.
गावठी विषारी दारूच्या विळख्यातून बहुतांश
महाराष्ट्र मुक्त झाला, तरीही काही भागात देशी दारूत मिथेनॉल आणि पाणी
मिसळून विषारी दारूची विक्री पोलिसांच्या संरक्षणाखालीच सुरू राहिली.
त्यामुळे मालवणी भागात ही दुर्घटना घडली आहे. मुळात या दुर्घटनेनंतर विविध
स्तरांतून तीव्र प्रतिक्रिया आल्यानंतर राज्य सरकार खडबडून जागे झाले होते.
त्यानंतर सरकारने राज्यातील सर्व दारूच्या हातभट्टयांवर बंदी घालण्याची
घोषणा केली. तसेच दोषींवर कडक कारवाई करण्याचे संकेतही दिलेले आहेत.
मात्र, हातभट्टया बंद करून चालणार नाही.
दारूवर बंदी घालण्यात यावी, अशी मागणी विरोधकांकडून लावून धरण्यात आली
होती; परंतु याबाबत सरकारमधील कोणीच काही बोलायला तयार नव्हते. त्यामुळे
दारू वाईट आहे, असे बोलण्यापेक्षा उत्पादनावरच बंदी घालायला हवी. विक्रीवर
किंवा दारू भट्टयांवर बंदी घालून काय होणार नाही. त्यामुळे एकीकडे दारूच्या
उत्पादनाला परवानगी द्यायची आणि दुसरीकडे विक्रीवर मात्र बंदी घालायची. ही
सरकारची दुटप्पी निती पाहायला मिळत आहे.
याशिवाय कमी वेळात अमाप पैसा कमविण्यासाठी
दारू विक्रेते लोकांच्या जीवाशी खेळतात. तसेच समाजातील जनतेच्या
रक्षणासाठी २४ तास ऑन डय़ूटी असणा-या पोलिसांना या घटनेची पूर्ण कल्पना
असूनही याबाबत इतकी र्वष कोणतीही ठोस पावले उचलण्यात न आल्याने आश्चर्य
व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई न
केल्याने या प्रकरणी गुन्हेगारीचे मोठे जाळे असल्याचे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, सरकारच्या आदेशानंतर या प्रकरणी
चौकशी करून गुन्हे अन्वेषण विभागाने काही दोषींना अटक केली आहे. याशिवाय
काही पोलीस अधिका-यांवर कारवाई करण्यात आली आहे. परंतु काही काळ दोषींवर
कारवाई करण्यात येईल. पण, हे वातावरण शांत झाल्यानंतर दोषींची जामिनावर
सुटकासुद्धा करण्यात येईल. सुटका झाल्यानंतर हेच दोषी पुन्हा दारूच्या
हातभट्टया सुरू करतील. त्यामुळे पुन्हा सर्वसामान्यांच्या जीवाशी खेळ सुरूच
राहील.
या दारूकांडात बळी गेलेले सर्व लोक अत्यंत
गरीब आणि झोपडपट्टयांत राहणारे आहेत. त्यांची कुटुंबे उघडयावर पडली आहेत.
राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबीयांना काहीही आर्थिक मदत अद्याप दिलेली
नाही. तसेच ओळखपत्र असल्याशिवाय मदत मिळणार नाही, असा नवा फतवा सरकारने
काढल्याने अनेक जणांना मदतीपासून वंचित राहावे लागणार आहे. त्यामुळे विषारी
दारूच्या उत्पादन, पुरवठा आणि विक्री करणाऱ्यांवर आज ना उद्या कडक कारवाई
होईल. पण या दारूकांडात बळी गेलेल्या मजुरांच्या बायका-मुलांचे आयुष्य
अंधार झाले, त्यांना मदत कोण आणि कशी करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
No comments:
Post a Comment