Tuesday, June 14, 2016

क्ष-किरण तंत्रज्ञांच्या भरतीप्रक्रियेत गुणवत्तेकडे दुर्लक्ष


‘परमाणू ऊर्जा नियामक परिषद’ यांच्या नियमावलीनुसार क्ष-किरण विभागात काम करणा-या कर्मचा-यांकडे ‘एक्स-रे टेक्निशियन्स’चा डिप्लोमा असणे बंधनकारक आहे. 
X - ray मुंबई - ‘परमाणू ऊर्जा नियामक परिषद’ यांच्या नियमावलीनुसार क्ष-किरण विभागात काम करणा-या कर्मचा-यांकडे ‘’चा डिप्लोमा असणे बंधनकारक आहे. मात्र, क्ष-किरण तंत्रज्ञांच्या भरतीसंदर्भात महाराष्ट्र सरकारद्वारे जानेवारीत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीत विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्रात पदवी संपादन केलेले विद्यार्थीच अर्ज करू शकतात. अन्य शाखेतील विद्यार्थ्यांचे अर्ज विचारात घेतले जाणार नाही, असे नमूद केले आहे.
तरीही सध्या महाराष्ट्रातील सरकारी व पालिका रुग्णालयात ९० टक्के क्ष-किरण तंत्रज्ञ कोणतेही प्रशिक्षण नसताना काम करत आहेत. याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याने ‘सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर’ या संघटनेच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. येत्या ३ मार्चला यावर सुनावणी होणार असून त्याआधी न्यायालयाने सरकारला मत मांडण्यासाठी एक महिन्याची मुदत दिली आहे.
महाराष्ट्रात क्ष-किरण तंत्रज्ञाच्या १४० जागा भरण्यासाठी आरोग्य मंत्रालयाद्वारे जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीत विज्ञान शाखेतून भौतिकशास्त्र, जीवशास्त्र व रसायनशास्त्र पदवीधरच अर्ज करू शकतात, असे म्हटले होते. अन्य शाखेतून किंवा ‘एक्स-रे टेक्निशियन्स’चा डिप्लोमा करणा-या व्यक्तींचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही, असे म्हटले होते.
२०११-१२ या वर्षापासून ‘महाराष्ट्र स्टेट ऑफ टेक्निकल एज्युकेशन’(एमएसबीटीई) तर्फे ‘अ‍ॅडव्हान्स डिप्लोमा एन मेडिकल इमेजिंग टेक्नोलॉजी’ हा दोन वर्षाचा डिप्लोमा कोर्स सुरू करण्यात आला आहे. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (एमयूएचएस)द्वारे ‘बॅचलर ऑफ पॅरामेडिकल टेक्नोलॉजी’ हे तीन वर्षाचे पदवी शिक्षण सुरू करण्यात आले आहे. याशिवाय, अन्य काही खासगी संस्थांनीही २-३ वर्षाचा ‘एक्स-रे टेक्निशियन्स’चा कोर्स सुरू केला आहे. पालिकेच्या केईएम, नायर व सायन या रुग्णालयातही दहावी व बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्ष-किरण विभागात काम करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी विविध कोर्स उपलब्ध आहेत. टाटा मेमोरिअल रुग्णालयातही ‘एक्स-रे टेक्निशियन्स’चे प्रशिक्षण मिळत आहे.
या विद्यार्थ्यांना एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय यांचे सविस्तर प्रशिक्षण देण्यात येते. परंतु सरकारच्या निवड प्रक्रियेतील नियमावलीनुसार गुणवत्ता असूनही हे विद्यार्थी अर्ज करू शकत नाहीत. या संदर्भात न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आता ३ मार्चला सुनावणी होणार आहे, अशी माहिती ‘सोसायटी ऑफ इंडियन रेडिओग्राफर’चे राष्ट्रीय संघटक शंकर भगत यांनी दिली.
संबंधित नियमावलीनुसार क्ष-किरण विभागात काम करण्यासाठी ‘एक्स-रे टेक्निशियन’चा डिप्लोमा असणे गरजेचे आहे. परंतु सरकारच्या जाहिरातीत याचा उल्लेख करण्यात आलेला नाही. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ‘परमाणू ऊर्जा नियामक परिषद’तर्फे राज्य सरकारला १५ दिवसांपूर्वीच पत्र पाठवण्यात आले आहे. - डॉ. अविनाश सोनावणे, परमाणू ऊर्जा नियामक परिषद, रेडिएशन सेफ्टी विभाग प्रमुख
123
..तरी डिप्लोमा बंधनकारक
क्ष-किरण हे आरोग्यास घातक असतात. या विभागात काम करणा-या तंत्रज्ञांना रेडिएशनमध्ये राहून काम करावे लागते. सतत २४ तास रेडिएशनमध्ये राहिल्याने विविध आजारांना निमंत्रण मिळते. या स्थितीत राहून स्वत:च्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या संदर्भात अभ्यासक्रमात शिकवले जाते. त्यामुळे, विज्ञान शाखेत पदवी असली तरी ‘एक्स-रे टेक्नोलॉजिस्ट’चा डिप्लोमा आवश्यक आहे.

No comments:

Post a Comment