आरती जाधव
मुंबई-
मानसिक ताणतणाव आणि ऑनडय़ुटी चोवीस तास असलेल्या मुंबई पोलिसांसमोर आता
जीवघेण्या आजाराचे संकट उभे राहिले आहे. कामाचा तणाव कमी करण्यासाठी पोलीस
तंबाखू व तत्सम पदार्थाचे सेवन करतात. याच्या परिणामामुळे मुंबई
पोलिसांमध्ये कर्करोगाचे प्रमाण भयानक वाढल्याचे आढळले आहे.
मानसिक ताणतणाव आणि ऑनडय़ुटी चोवीस तास असलेल्या मुंबई पोलिसांसमोर आता जीवघेण्या आजाराचे संकट उभे राहिले आहे.
३००० पोलिसांपैकी २१५० पोलीस तंबाखूजन्य
पदार्थाचे सेवन करत असून त्यापैकी ९५० पोलिसांना कर्करोगाची प्राथमिक
लक्षणे दिसून आली आहेत. कॅन्सर पेशंट्स अॅण्ड असोसिएशनने (सीपीएए) मुंबई
पोलिसांमधील तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाच्या सवयींबाबत केलेल्या
सर्वेक्षणातून ही बाब उघडकीस आली आहे.
तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाचे वाढते
प्रमाण, अपायकारक आहार आदी कारणांमुळे देशात कर्करोगामुळे मृत्यू
होणा-यांची संख्या वाढत आहे. देशात रोज १,३०० जणांचा कर्करोगामुळे मृत्यू
होत आहे. तसेच पोलिसांमध्ये बहुतांश जणांना तंबाखू खाण्याची सवय असल्याने
यांना कर्करोग होण्याचा जास्त धोका आहे. यामुळे ‘सीपीएए’तर्फे पोलिसांसाठी
नायगाव, दिंडोशी, वरळी, मरिन ड्राईव्ह, ताडदेव, मलबार हिल, बीकेसी आणि दादर
पोलीस ठाण्यांमध्ये तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
‘सीपीएए’च्या कार्यकारी संचालिका अनिता
पीटर म्हणाल्या की, पोलिसांमध्ये तंबाखूजन्य पदार्थाचे वाढते सेवन आणि
त्याचा परिणाम तपासण्यासाठी सर्वेक्षण केले होते. दरम्यान, नोकरीतील
तणावामुळे पोलिसांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. सर्वसामान्य नागरिकांपेक्षा
पोलिसांमध्ये तणावाचे प्रमाण अधिक आहे. हेच तंबाखू सेवनाचे मुख्य कारण आहे.
या कारणास्तव तंबाखूजन्य पदार्थाचे सेवन करणा-या पोलिसांमध्ये मुख व
फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण मोठया प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे
पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तंबाखू सेवनाची सवय सोडविण्यासाठी तसेच
कामाच्या व्यापातून येणारा तणाव आणि कंटाळा यातून पोलिसांना मुक्ती मिळावी,
यासाठी विशेष उपक्रम गरजेचा आहे.
त्यानुसार ‘सीपीएए’तर्फे येत्या ३१ मे
रोजी जागतिक तंबाखूविरोधी दिनानिमित्त मुंबईतील आझाद मैदान येथील पोलीस
क्लब येथे तंबाखूरहित मुंबई पोलीस ठाणे ही विशेष मोहीम राबविण्यात येणार
आहे. त्याचा शुभारंभ २२ मे रोजी करण्यात येईल. दर तीन आणि सहा महिन्यांच्या
अंतराने पुन्हा त्यांची तपासणी करण्यात येणार असल्याचेही पीटर यांनी
सांगितले.
पोलिसांमधील वाढत्या कर्करोगाची दखल
मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी घेतली आहे. त्यांनी पोलिसांमध्ये
जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि तणावरहित आयुष्य जगण्यासाठी उपक्रम
राबवण्याचे ठरवले आहे.
पोलिसांना विविध आजारांचा विळखा
कामाचे अनेक तास, अनियमित आहार आणि
कमालीचा ताण यामुळे मुंबई पोलीस अनारोग्याला बळी पडत आहेत. उच्च रक्तदाब,
मधुमेहासारखे आयुष्यभराचे आजारही त्यांच्या मागे लागले आहेत. गेल्या चार
महिन्यांत मुंबई पोलीस दलातील ४४ पोलीस अधिका-यांचा विविध आजारांनी मृत्यू
झाल्याचे आकडेवारीनुसार स्पष्ट झाले आहे.
» यकृत आणि कावीळ ३
» कर्करोग ४
» अपघात ५
» किडनीचे आजार २
» हृदयविकार १३
» मधुमेह १
» एचआयव्ही १
» दमा २
» मेंदूतील रक्तस्राव ३
» अतिरक्तदाब ३
» अकस्मात मृत्यू ७
No comments:
Post a Comment