Thursday, April 21, 2016

अवयवदानाबाबत जनजागृतीची गरज

व्यक्तीचे जीवन हे क्षणभंगूर असते. ठरावीक काळानंतर सर्व काही समाप्त होते. मात्र, अवयवरूपी जिवंत राहायचे असल्यास अवयवदान करा.. हा नव्याने जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे.
body partव्यक्तीचे जीवन हे क्षणभंगूर असते. ठरावीक काळानंतर सर्व काही समाप्त होते. मात्र, अवयवरूपी जिवंत राहायचे असल्यास अवयवदान करा.. हा नव्याने जीवन जगण्याचा उत्तम मार्ग आहे.
मृत्यूपश्चात एक अवयव सात जणांच्या आयुष्यात आशेचा एक नवीन किरण घेऊन येतो. परंतु आपल्या समाजात अवयवदानाबाबत लोकांमध्ये गरसमजुतीची भावना अधिक असल्याने ते अवयवदान करण्याबाबत धास्तावलेले असतात.
आपल्या शरीरातील एक अवयव दान केल्यास पुढल्या जन्मी आपल्याला एक अवयव कमी मिळेल, अशी भीती लोकांच्या मनात असते. या कारणास्तव बहुतांश लोक अवयवदान करण्यापासून दूर राहतात. त्यामुळे अशा लोकांमध्ये जागरुकता निर्माण करणे गरजेचे आहे.
शरीरातील डोळा, किडनी अगदी एखादा अवयव निकामी झालेले अनेक गरजू व्यक्तींच्या चेह-यावर हास्य उमटायचे असल्याने अवयवदानाशिवाय श्रेष्ठ दान कुठलेच नाही. आपल्या देशात लाखोंच्या वर लोकांचे काही अवयव निकामी झालेले आहेत. काही जणांचे अपघाती, तर काहींचे जन्मत: परंतु आता विज्ञानाने खूप प्रगती केली असून अवयव प्रत्यारोपणातून या रुग्णांचे जीवन सुखमय करता येऊ शकते.
मात्र, गरजूंच्या तुलनेत दानशूर व्यक्ती कमी असल्याची वस्तुस्थिती आहे, हे नाकारून चालणार नाही. डोळे, किडनी, हृदय, फुप्फुस यासारखी महत्त्वाची अवयव निकामी झाल्याने आज राज्यभरात हजारो रुग्ण पीडित आहेत. हे रुग्ण अद्याप अवयव प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षेत आहेत.
मुळात किडनीसारख्या अवयवाचे जिवंतपणी दान करताही येते. पण त्यासाठी दात्यावर शस्त्रक्रिया करावी लागते. त्यात एक मोठी जोखीम असते. याशिवाय दात्याला काम करण्यावरही बंधने येऊ शकतात. त्यामुळे मरणोत्तर अवयवदान उत्तम समजले जाते.
हृदयप्रक्रिया बंद पडल्यानंतर सहा तासात हृदय, यकृत, मूत्रिपड, फुप्फुस हे अवयव काढून घेता आले तरी ब-याच प्रतीक्षेत असलेल्या लोकांना जीवनदान मिळू शकेल.
मरणोत्तर दान केल्या जाणा-या अवयवांचा कोणताही आíथक मोबदला मिळत नाही. त्यासाठी जात वा धर्म लक्षात घेतला जात नाही. परंतु दुर्दैवाने अजूनही समाजात अवयवदानाबाबत पुरेशी जनजागृती नसल्यामुळे या रुग्णांना वेळेत अवयव मिळत नाहीत. त्यामुळे या रुग्णांना प्रसंगी मृत्यूलाही सामोरे जावे लागते.
२०१२ मध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे यकृत व मूत्रिपड निकामी झाले होते. त्यामुळे त्यांना जर वेळेवर अवयवदाता मिळाला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. म्हणून पैसे कितीही असले तरी पैशामुळे आपले प्राण वाचू शकत नाही, हे त्या प्रसंगानंतर सर्वाना ठाऊक झाले.
अवयवदानाबाबत पूर्वी फारशी जनजागृती नसल्याने मृत्यूचे प्रसंग ओढावला. मात्र, विलासरावांच्या निधनानंतर अवयवदानाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यात काहीना काही दान करत असते. परंतु अवयव दान करून मिळणारे सुख काही वेगळेच असते. हिंदू धर्माप्रमाणे मृत्यूनंतर आपले प्रेत जाळण्यासाठी स्मशानभूमीत लाकडाचा वापर करण्यात येतो. त्यामुळे पर्यावरणाची हानी होण्याची शक्यता असते. म्हणून अवयव दान करा, त्यामुळे समाजाला फायदाच होईल.
अवयदानाबाबत जागृती बाळगण्याऐवजी त्याबाबतचे निकष लोकांना माहीत असणे आवश्यक आहे. मुळात याबाबत अनेक गरसमजुतीचा पगडा लोकांच्या मनावर आहे. तो आधी दूर झाला पाहिजे. आपल्या देशात जवळपास लाखोंच्या घरात लोक अवयव निकामी झाल्याने आजारी पडतात वा मृत्यूला सामोरे जातात.
लोकांमध्ये अवयवदानाबाबत जागृतीचा अभाव, सरकारी कायद्यातील आडकाठी अशा अनेक कारणांनी अवयदानाचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. व्यक्तींच्या अवयवाला पर्याय म्हणून दुस-या व्यक्तीच्या शरीरातील अवयव काढून त्याचे प्रत्यारोपणही करता येणे सहज शक्य झाले आहे. त्यामुळे देहदान, नेत्रदान, किडनीदान यांसारख्या संकल्पना समाजात रुजू लागल्या आहेत.
परंतु भारतात अवयवदानाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे. म्हणून जग कितीही पुढे गेले तरी मनुष्य मनाने आणि वागणुकीमुळे अजूनही मागेच आहे, असं म्हटलं तर चुकीचे ठरणार नाही. प्रत्येक व्यक्ती जन्माला येताना आपली सुंदरता घेऊन जन्माला येतो. त्यामुळे जीवनाचा अंत झाल्यावर हे
सौंदर्यसुद्धा नष्ट होते.
तसं पाहिलं तर समाजात जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंदी सिनेसृष्टीतील कलाकारांना घेऊन जाहिरातींच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे. आज अनेक कलाकार आपले अवयव दान करण्यासाठी तयार झाले असले तरी ते केवळ बोलण्यापुरतेच असते. प्रत्यक्षात मात्र, अवयव दान करण्यासाठी कोणी पुढाकार घेत नाही.
अवयवदान अत्यंत अनन्यसाधारण आहे. आजच्या घडीला कित्येक रुग्णांना उपचाराअभावी किंवा आíथक पाठबळ नसल्याने मृत्यूचा सामना करावा लागतो. त्यामुळे अवयवदान करण्यासाठी जनजागृतीची गरज आहे. परंतु अवयवदान करण्याबाबत लोकांच्या मनात अद्याप परिपूर्ण जनजागृती निर्माण झालेली नाही. अवयवदान केल्याने दुस-या व्यक्तीला जीवनदान मिळते.
मात्र, अवयवदान कुठे व कसे करायचे, याबाबत लोकांमध्ये जागरुकता नाही. भारतात असलेल्या धार्मिक चालीरिती आणि त्याचा समाजावर असलेला पगडा यामुळे समाजात अवयवदान करण्याची मानसिकता दिसून येत नाही. त्यामुळे अशा लोकांमध्य जागरुकता निर्माण करणे गरजेचे झाले आहे.
याकरिता सरकारने अवयवदान करा..असा कायदा केला. परंतु अवयवदानाबाबत लोकांमध्ये जागरुकता नसल्याने तसेच काही त्रुटी असल्याने अवयव प्रत्यारोपण अद्याप दुर्लक्षित राहिले आहे.
कोणत्याही खासगी किंवा शासकीय रुग्णालयात अवयवदानाबाबत माहिती देण्याकरिता स्वतंत्र कक्ष नाही. सरकारने अवयवदान जागरुकतेसाठी ठिकठिकाणी माहिती केंद्र, हेल्पलाईन सुरू करावी. अवयवदान करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्यांचा सरकारने बक्षीस देऊन जाहीर सत्कार करावा.
जेणेकरून अवयवदानाबाबत लोक स्वत:हून पुढे येतील. इतकेच नव्हे तर सामाजिक संस्था आणि आरोग्य विभागाने विशेष पुढाकार घेऊन अवयवदानाबाबत जनजागृती निर्माण केली पाहिजे. तसेच अनेक व्यक्तींना अवयवांची गरज आहे.
समाजात आपण काहीतरी देणं लागतो. ही भावना जरी प्रत्येकाच्या मनात रुजली तरी अवयवदानाबाबत लोकांच्या मनात जनजागृती निर्माण होईल. परंतु हे एका रात्रीत पूर्ण होणे शक्य नाही. यासाठी सर्वाना मनापासून एकत्र येणे गरजेचे आहे. एखाद्याने स्वत:ची जबाबदारी समजून अवयवदान केले तर एक जीव आपण वाचवू शकतो.
अवयव निकामी झाल्याने व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे वारंवार वृत्तपत्रांतून किंवा परिसरातील नागरिकांच्या तोंडून ऐकत असतो. परंतु जेव्हा भविष्यात अवयव निकामी झाल्यामुळे व्यक्तींचा मृत्यू झाला ही बातमी ऐकिवात मिळणार नाही. त्यावेळी ख-या अर्थाने अवयवदानाबाबत लोक जागृत झाले, असे म्हणता येईल.

No comments:

Post a Comment